रेल्वे अपघातात मयत महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन

On: July 21, 2021 9:18 PM

जळगाव : भुसावळ ते जळगाव दरम्यान अप रेल्वे लाईनवर खांब क्रमांक 422/18 – 20 दरम्यान एका अनोळखी महिलेचा मृतदेह आज (21 जुलै) दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

या महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महिलेची कुठे मिसींग दाखल असल्यास जळगाव तालुका पोलिस स्टेशनशी 0257 – 2253002 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मयत महीलेच्या अंगावर हिरवी केशरी रंगाची साडी व त्यावर निळापटटा आहे. हिरव्या रंगाचे ब्लाऊज तिने परीधान केले असून कुणाला या महिलेच्या बाबतीत माहिती असल्यास जळगाव तालुका पोलिस स्टेशन (साहेबराव पाटील मो नं 9767334053) यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment