लुटीची झाली उकल – फिर्यादीच निघाला चोरटा

On: July 24, 2021 10:40 AM

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील हतगड -कनाशी मार्गावर असलेल्या गायदर घाटात अज्ञातांनी हल्ला करत 77 हजार रुपयांची रोकड व सुमारे 7 हजाराचा मोबाईल चोरीची तक्रार देण्यात आली होती. या लुटीत फिर्यादीचा बनाव उघडकीस आला आहे. फिर्यादीनेच हा बनाव केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न  झाले आहे. तक्रारदार हा एका खासगी कंपनीत दिंडोरी, वणी, कनाशी, अभोणा या परिसरात रक्कम जमा करण्याचे काम करतो.

13 जुलै रोजी हतगड ते कनाशी रस्त्यावर गायदर घाटात अभिजित भास्कर वाघ (रा. नाशिक) यांनी सुरगाणा पोलिस स्टेशनला लुटमारीची तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीत अज्ञात चोरट्यांनी घाटात हल्ला करत 1 लाख 77 हजार रोख रकमेसह मोबाइल हिसकावल्याचे नमुद करण्यात आले होते. चोरट्यांनी चाकूने उजव्या हातावर व डोक्यावर वार करत हेल्मेटची तोडफोड केल्याचे देखील म्हटले होते.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक शर्मिला वालावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांनी या तक्रारीची दखल घेत घटनास्थळी पाहणी केली होती. मात्र चौकशी व तपासाअंती फिर्यादीनेच दरोड्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. तशी फिर्यादीनेच कबुली दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. फिर्यादी अभिजीत वाघ यास दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment