सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती तथा उद्योगपती राज कुंद्राच्या अटकेपासून दररोज नवनवीन बातम्या पुढे येत आहेत. पोर्न फिल्म प्रकरणी अटकेतील राज कुंद्रा याचे कानपूर कनेक्शन समोर आले आहे. कानपूर येथील दोघा महिलांच्या खात्यात कलेक्शनच्या रकमा जमा होत असल्याचे उघड झाले आहे. ही दोन्ही खाती मुंबई गुन्हे अन्वेशन शाखेच्या आदेशाने सिज करण्यात आली आहेत.

हर्षिता श्रीवास्तव आणि नर्बदा श्रीवास्तव या नावाने कानपूर येथील ही बॅंक खाती आहेत. या खात्यांमधे 2.38 कोटी रुपये जमा आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा याच्याशी संपर्क असलेल्या एकुण 11 जणांची 18 बॅंक खाती सिज केली आहेत. या खात्यांमधे 7.31 कोटी रुपये जमा असल्याचे दिसून आले आहे. यापैकी दोन खाती कानपूर येथील आहेत.
पोर्न फिल्मच्या माध्यमातून कमाई केलेल्या रकमेचा वापर राज कुंद्र याने ऑनलाइन बेटींगसाठी वापर केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. राज कुंद्रा याच्या अटकेनंतर डीलीट करण्यात आलेला डाटा पुन्हा परत मिळवण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. दरम्यान पोर्न अॅप आणि पोर्न सिनेमा बाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा खुलासा शिल्पा शेट्टी हिने पोलिसांना दिला आहे. आपला पती निर्दोष असल्याचा दावा तिने केला आहे.
