स.पो.नि. राहुल वाघ यांच्या कारवाईत तिघे दुचाकीचोर ताब्यात

नाशिक : लासलगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या बळावर तिघा दुचाकी चोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघा चोरट्यांकडून अंदाजे 1 लाख 53 हजार रुपयांच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सोमनाथ धोंडीराम हगवणे, गणेश बाळू गवळी व संजय ऊर्फ बाळा छबू पवार अशी अटकेतील तिघा चोरट्यांची नावे आहेत.

लासलगाव नजीक विंचूर येथील रहिवासी असलेले सुभाष गुजर यांची दुचाकी चोरी झाली होती. याप्रकरणी त्यांनी लासलगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी तपास सुरु असतांना सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे व पोलिस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करण्यात आली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे निफाड तालुक्यातील विष्णूनगर येथील सोमनाथ धोंडीराम हगवणे व विंचूर येथील गणेश बाळू गवळी यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी लासलगाव नजीक निमगाव वाकडा येथील संजय ऊर्फ बाळा छबू पवार याच्या मदतीने लासलगाव पोलिस स्टेशन परिसरातून तीन व येवला तालुका पोलिस स्टेशन हद्दीतून एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आली.

अटकेतील चोरट्यांकडून 1 लाख 53 हजार रुपयांच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. स.पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजे घुगे, पोलिस नाईक योगेश शिंदे, पोलिस नाईक कैलास महाजन, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे, पोलिस कॉन्स्टेबल कैलास मानकर, पोलिस कॉन्स्टेबल देवीदास पानसरे व पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब कोते यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here