नाशिक : इगतपुरी तालुक्यात घोटी येथील विवाहितेने सासरच्या त्रासाला वैतागून शनिवार 24 जून रोजी रेल्वेखाली आत्महत्या करत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहीतेच्या वडीलांनी घोटी पोलिस स्टेशनला सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

घोटी येथील विलास वैभव लाड याच्यासोबत नाशिक येथील रतन रामनाथ सोनार यांची कन्या अक्षदा (22) हिचा विवाह झाला होता. सुरुवातीचे सहा महिने अक्षदासाठी सुखाचे गेले. मात्र नंतर तिला सासरचा जाच होवू लागला. फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेवून येण्यासाठी तिचा जाच वाढत गेला. तिला वेळोवेळ सासरच्या मंडळींकडून मारहाण व शिवीगाळ होवू लागली. या छळाला वैतागून तिने रेल्वेखाली जिव देत आत्महत्या केली.
अक्षदाचा पती वैभव लाड, विलास लाड, ज्योती विलास लाड, मोनू विलास लाड यांच्या विरुद्ध घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय कवडे करत आहेत.
