बलात्कार तपासप्रकरणी स.पो.नि. निता गायकवाड निलंबीत

बीड : सुर्डी (ता. माजलगाव) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या तपास प्रकरणात दिरंगाई व निष्काळजीपणाचा ठपका ठेवत स.पो.नि. निता गायकवाड यांना निलंबीत करण्यात आले आहे. प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी स.पो.नि. नीता गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

13 जुलै रोजी संशयीत पुरुषोत्तम श्रीराम घाटूळ याने एका नऊ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आले होता. या घटनेत बालिका गंभीर जखमी झाली होती. या गंभीर जखमी बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरु होते. या प्रकरणी स.पो.नि. निता गायकवाड यांनी संशयीताच्या पोलिस कोठडीची न्यायालयात मागणी केली नसल्याचे उघड झाले. त्यामुळे संशयीताला फायदा होत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

चौकशीअंती स.पो.नि. निता गायकवाड यांचा निष्काळजीपणा समोर आल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा तपास डिवायएसपी सुरेश पाटील यांच्याकडे देण्यात आला असल्याचे बिडचे प्रभारी पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार यांनी म्हटले आहे. संशयीत आरोपीस शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार असल्याचे तपास अधिकारी तथा माजलगावचे उप विभागीय अधिकारी सुरेश पाटील यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here