जळगावचे उपमहापौर गोळीबारातून बचावले

On: July 25, 2021 11:15 PM

जळगाव : जळगावचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्या घराच्या दिशेने आज रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान गोळीबाराच्या या घटनेने जळगाव शहर व परिसरात खळबळ माजली आहे. सदर गोळीबार हा पुर्ववैमनस्यातून झाला असल्याचे समर्थन केले जात आहे. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार गोळीबार करणारे हल्लेखोर चारचाकी वाहनातून आले होते.

उप महापौर कुलभुषण पाटील हे जळगाव शहराच्या पिंप्राळा या उपनगरात राहतात. त्यांच्या घराच्या दिशेने करण्यात आलेल्या गोळीबारात ते सुदैवाने बचावले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगावचे उप – महापौर या घटनेप्रकरणी तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल झाले होते. दरम्यान या घटनेने जळगाव शहराच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment