उप महापौरांवर गोळीबार करणारे संशयीत अटकेत

On: July 26, 2021 8:01 PM

जळगाव : जळगावचे शिवसेनेचे उप – महापौर कुलभुषण पाटील यांच्यावर काल रात्री गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत कुलभुषण पाटील बचावले आहेत. या प्रकरणी काल रात्री पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. रामानंद नगर पोलिसांच्या शोध पथकाने उमेश पांडुरंग राजपूत व किरण शरद राजपूत (दोघे रा. पिंप्राळा जळगाव) या दोघांना चौकशीकामी ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

उप महापौर कुलभुषण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत महेंद्र राजपूत, उमेश राजपूत्म मंगल राजपूत आणि बि-हाडे (पुर्ण नाव माहिती नाही) यांची नावे घेतली होती. अटकेतील आरोपींविरुद्ध भा.द.वि. 307, 341, 504, 06, 507 व शस्त्र अधिनियम कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप परदेशी व त्यांच्या सहका-यांनी तपासाची चक्रे वेगवान केली होती. त्यात त्यांना यश आले. संशयीत उमेश राजपूत व किरण राजपूत (दोघे रा. पिंप्राळा जळगाव) यांना जामंवेर तालुक्यातील मालखेडा या गावातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. पुढील; तपास पो.नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment