जळगाव : जळगाव शहरात दुपारी चार वाजेनंतर लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याची संधी साधत दुकानांमधे चो-या होण्याचे प्रमाण वाढले होते. तशा अनेक तक्रारी शहर पोलिसांकडे आल्या होत्या. त्या अनुशंगाने जळगाव शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथक कार्यरत होते.
दुकानांमधील चोरी केलेल्या मालाची विक्री चोरटे करत असल्याच्या माहीतीच्या आधारे निलेश सुरेश वाणी व चेतन दिलीप चौधरी (दोन्ही रा. कांचन नगर जळगाव ) यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. जळगांव शहर पोलिस स्टेशनला भाग -5 गु.र.नं. 247/21 भा.द.वि. 454,457, 380 नुसार दाखल गुन्हयातील मुददेमाल दोघांनी काढुन दिला आहे.
पो.नि. लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. तेजस मराठे, योगेश इंधाटे, पो.हे.कॉ. विजय निकुंभ, पो.हे.कॉ. उमेश भांडारकर, पो.हे.कॉ. अक्रम शेख, पो.ना. भास्कर ठाकरे, पो.ना. किशोर निकुंभ, पो. न. गणेश पाटील, पो.कॉ. रतन ग़ीते आदींनी या तपासकामात सहभाग घेतला.