पुणे : क्लासची फी भरण्यासाठी पैसे नसल्याचे बघून शिक्षकाने तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. क्लासची फी भरण्याचे आमीष दाखवून हा प्रकार झाला आहे.
कसबा पेठेत राहणार्या १८ वर्षाच्या तरुणीने याप्रकरणी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मोसीन शेख (३२) रा. कौसरबाग, कोंढवा खुर्द याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करियर गायडन्स करणार्या कॅप्टन मनाल कोचिंग क्लासेस येथे मोसीन शेख हा शिक्षक आहे. पिडीत तरुणीने बारावीची परिक्षा दिली असून त्याचा निकाल प्रलंबीत आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर २०१९ मध्ये मोसीन शेख याने करिअर गाईडन्स या विषयावर लेक्चर दिले होते़ त्यावेळी त्याने विद्यार्थ्यांना आपला मोबाईल क्रमांक दिला होता़. पिडीत तरुणीला मर्चंट नेव्हीचा कोर्स करायचा होता. त्यासाठी तिने ४ जुलै रोजी मोसीन शेख यास फोन केला़ होता. फोनवरील संभाषनानंतर त्याने तरुणीला कौसरबागेतील क्लासमध्ये येण्यास सांगितले होते.
त्यानुसार तरुणी आईला घेऊन क्लासमध्ये मोसीन शेख यास भेटली होती. प्रवेश परिक्षेच्या फॉर्मचे १२०० रुपये व क्लासचे ७ हजार रुपये फी त्याने सांगितली होती. ८ जुलै रोजी क्लास सुरु झाला. मात्र तरुणी फी चे पैसे भरु शकत नव्हती. त्यामुळे ती क्लासला गेली नाही. शेख याने तिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी तरुणीने क्लासची फी जास्त असल्याचे सांगीतले. आपण ती फी भरु शकत नाही असे सांगितले.
त्याने दुसर्या दिवशी कुंभारवाड्याहून तिला आपल्या कारमध्ये घेत बसवले. फीचे मी पाहतो असे सांगत त्याने तिला क्लासवर आणले. तिला कारमध्येच बसवून तो वर गेला. थोड्या वेळाने तो परत खाली आला. अशोका म्युज येथे मित्राकडे काम असल्याचे सांगून तो तिला तेथे घेऊन गेला. या ठिकाणी त्याने या तरुणीवर लैंगीक अत्याचार केला. घडलेला प्रकार तरुणीने आईला सांगत कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. कोंढवा पोलीस मोसीन शेखचा शोध घेत आहेत.