जळगाव : दुपारी चार ते रात्री नऊ दरम्यान हॉटेलमधे आलेल्या ग्राहकांना केवळ पार्सल सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश असतांना डायनिंग सेवा सुरु ठेवल्याप्रकरणी हॉटेल त्रिमुर्तीवर 25 रोजी कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव औरंगाबाद मार्गावरील हॉटेल त्रिमुर्ती येथे 25 जुलै रोजी रात्री नऊ वाजता एमआयडीसी पोलिसांचे पथकाने कारवाई केली. यावेळी हॉटेलमधे 12 ग्राहकांना डायनिंग सेवेची सुविधा दिली जात असल्याचे तपास पथकाला आढळून आले. याप्रकरणी हॉटेल मालक व व्यवस्थापक यांच्याविरुद्ध भा.द.वि. 188, 269 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा सन 2005 मधील 51 ते 60 नुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पो.नि.प्रताप शिकारे यांच्या निर्देशानुसार सहायक फौजदार अतुल वंजारी, स.फौ. आनंदसिंग पाटील, पो.कॉ. सचिन पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.