मुंबई : अश्लिल चित्रफितीच्या निर्मिती आणि वितरण प्रकरणी सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठड सुनावण्यात आली आहे. या तपासाच्या खोदकामात नवनवीन माहिती उघड होत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला नवीन 120 अश्लिल चित्रफिती आढळून आल्या आहेत. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी अजूनच वाढल्या आहेत.

अश्लील चित्रपटांच्या निर्मीतीसाठी बनावट निर्माते तयार करण्यात आले होते. या चित्रपटांच्या निर्मितीसाठी राज कुंद्रा हाच फायनान्सर होता. प्रत्येक निर्मात्याची एक स्वतंत्र टीम रहात होती. एकाच वेळी अनेक चित्रपटांचे इनडोर शुटींग केले जात होते. राज कुंद्राने गेल्या मार्च महिन्यात फोन बदलला होता. त्यामुळे गुन्हे शाखेला त्याच्या जुन्या मोबाईलमधील डेटा अजून मिळालेला नाही. तो डेटा मिळाल्यास अजुन बरीच माहिती हाती लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

राज कुंद्रा यास चौदा दिवसांची एमसीआर सुनावण्यात आली आहे. 19 जुलै रोजी राज कुंद्रा याला मुंबईच्या गुन्हे शाखेकडून उशिरा रात्री अटक करण्यात आली होती. 20 जुलै रोजी न्यायालयाने त्याला तिन दिवसांची पोलीस कोठडीत रवानगीचे आदेश बजावले होते. त्यानंतर पुन्हा 27 जुलै पर्यंत कोठडी सुनावली होती. आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. काही फरार आरोपींचा शोध सुरु आहे.