जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज यावल येथून यश राजेंद्र पाटील ( सुंदरनगरी यावल) या तरुणास गावठी कट्ट्यासह ताब्यात घेत अटक केली. पो.नि.किरणकुमार बकाले यांनी तयार केलेल्या पथकातील स.फौ.अशोक महाजन, स.फौ.शरीफ काझी, पो.ना.युनुस शेख, पोना किशोर राठोड, पो.काँ. विनोद पाटील, पोकाँ रणजित जाधव आदिंनी या कारवाईत सहभाग घेतला.
यश राजेंद्र पाटील यास ताब्यात घेत अटक करण्यात आली असून त्याला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला भाग 6 गु र. न. 85/2021 आर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.