जळगाव : जळगावचे शिवसेनेचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणी फरार असलेल्या महेंद्र पाटील यास मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. रामानंद नगरचे स.पो.नि. संदीप परदेशी व त्यांचे सहकारी हे.कॉ. संजय सपकाळे, पोलिस नाईक संदिप महाजन, पो.कॉ. अजय सपकाळे, पो.नाईक प्रविण जगदाळे व पोलिस नाईक सुशिल चौधरी यांच्या पथकासह एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी समाधान पाटील व हेमनाथ पाटील आदींनी कसून शोध घेत फरार महेंद्र पाटील यास म्हसावद येथुन ताब्यात घेत अटक केली आहे.
म्हसावद या गावी लपून बसलेल्या महेंद्र पाटील यास रात्री बारा वाजता अटक करण्यात आल्याने अटकेतील संशयीत आरोपींची संख्या आता तिन झाली आहे. एमएच 48 एफ 1422 या इनोव्हा कारने तो पळून जात असतांना त्याला अटक करण्यात आली.