रस्त्यांच्या दयनीय अवस्थेला जबाबदार मनपा प्रशासनाचा अनोखा निषेध

On: July 28, 2021 3:16 PM

जळगाव : जळगाव शहर मनपा हद्दीतील जवळपास सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. प्रत्येक पावसाळ्यात विविध रहिवासी भागात चिखल होऊन पाणी साचण्याच्या घटना नेहमीच्या आहेत. या बिकट अवस्थेतून नागरिकांना वाट काढत जावे लागते.

नागरी वस्त्यांमधे वारंवार होणारा चिखल आणि साचणा-या पाण्याची व रस्त्यांवर विविध ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची समस्या मार्गी लावण्यात मनपा प्रशासनाला अपयश आल्याचे म्हटले जात आहे. हे अपयश बघता माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी मनपा प्रशासनाचा अनोख्या रितीने निषेध व्यक्त केला आहे.

दीपककुमार गुप्ता यांच्या मते मनपा प्रशासन निद्रिस्त अवस्थेत नसून मृतास्थेत आहे. या मृतावस्थेतील मनपा प्रशासनाचा (यंत्रणेचा) दीपककुमार गुप्ता यांनी चिखलाच्या रस्त्यावर फुले वाहून शोक व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment