मराठा फाउंडेशन – जिल्हा संघटकपदी सुमित पाटील

On: July 28, 2021 5:32 PM

जळगाव : मराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी जळगाव तालुक्याच्या वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते सुमित जानकीराम पाटील यांची निवड झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब जाधव यांच्या मान्यतेने धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी सदर निवड केली आहे. गौरी उद्योग समूह व खान्देश कुणबी पाटील वधू-वर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या बापुसाहेब सुमित पाटील यांचे उल्लेखनीय कार्य बघून ही निवड करण्यात आली आहे.

सुमित पाटील यांनी त्यांनी समाजबांधवांच्या सहकार्याने असंख्य लग्न जुळवले आहेत. अनेक वादग्रस्त दांपत्याचे मनोमिलन करुन त्यांचा संसार पुन्हा फुलवला आहे. विधवांचे पुनर्विवाह, घटस्फोटीतांचे लग्न जुळवणे आदी उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. कोरोना कालावधीत गरीब, गरजूंना त्यांनी सर्वतोपरी मदत केली आहे.

समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा बंद करुन आधुनिकतेची कास धरण्यासाठी ते नेहमी जनजागृती करत असतात. मराठा समाजातील पोटजातींच्या एकत्रीकरणावर देखील त्यांचा नेहमी भर असतो. या कार्याची दखल घेऊन सदर नियुक्ती करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment