सोलापूर : अवैध सावकारी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास नारायण म्याकल (प्रियदर्शनी नगर, जुना विडी घरकुल हैद्राबाद रोड सोलापूर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.
उपनिबंधक कार्यालयाकडून पोलिस बंदोबस्तात त्याचे दुकान व घराची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत म्याकलकडे कोरे चेक, बॉण्ड असा मुद्देमालआढळून आला. याप्रकरणी विश्वनाथ शिवण्णा नाकेदार (50), रा. प्लॉट नं. 2, सन्मान नगर, विजापूर रोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक बाळकृष्ण कोंडा व सुनंदा अशोक कोंडा (रा पद्मनगर,अक्कलकोट रोड) यांनी उपनिबंधक कार्यालयात अवैध सावकाराविरुध्द तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार त्या दोघांचेही जबाब घेण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार अंबादास नारायण म्याकल यांचे प्रियदर्शन नावाच्या दुकानावर लोकांना व्याजाने पैसे देत असल्याचे उघड झाले. उपनिबंधक सह. संस्था कार्यालयाकडून त्याचे घर व दुकानाच्या तपासणीत कोरे चेक, बॉण्ड पेपर आदी आढळून आले आहेत.