गोंदेगाव ता.सोयगाव (वार्ताहर) :- सोयगाव तालुक्यातील निंभोरा येथे कृषिदूत विद्यार्थ्याने ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांसह, ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध विषयांसह शेती विषयक माहिती देण्यात आली.
दोंडाईचा येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी मयूर दौलत पाटील याने निंभोरा ग्रामपंचायतला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांच्या अडचणींचा आढावा जाणून घेत ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्याशी समन्वय साधून माहिती जाणून घेतली तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देत विविध प्रात्यक्षिकांची माहिती दिली याप्रसंगी सरपंच चंद्रकला भगवान निकम, ग्रामपंचायत सदस्य गोरक पाटील, ग्रा. सदस्य दादाभाऊ पाटील, नरेंद्र निकम ,सुखदेव साळुंके, दिलीप वाणी, सुनील वाघ, सत्तार शहा, जगन निकम, निलेश पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर पाटील,कार्यक्रम समन्वयक प्रा.सुरज चांदुरकर,प्रा.अलंकार वाघमोडे, प्रा.पराग बागुल,प्रा.अक्षय पडघान, प्रा.राहुल पाटील इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.