…..आता पारदर्शक मास्कची क्रेज़ !!!

न्यूयॉर्क : आपल्याला रोजच्या जीवनात मास्क परिधान करावा लागेल असे सात-आठ महिन्यांपूर्वी कुणी म्हटले असते तर आपण त्याला आपण वेड्यात काढले असते. परंतू आता जगभरातील लोकांचे तोंड मास्कने झाकली आहेत. असे असले तरी  लोकांची नावीन्याची हौस कमी झालेली नाही.

सोन्या-चांदीच्या मास्कपासून खास वधू-वरांसाठी मोती जडवलेले डिझायनर मास्कदेखील तयार केले गेले आहेत. एका व्यक्तीने तर एलईडी दिवे जोडलेले व आवाजाप्रमाणे ओठांसारखी हालचाल दाखवणारा तसेच आवाज मोठा करून ऐकवणारा मास्कही तयार केला आहे.

आता अमेरिकेत एका कंपनीने पारदर्शक मास्क तयार केले आहेत. मास्कमुळे चेहरा झाकला जातो. त्यामुळे समोर कोण उभे आहे हे पटकन ओळखता येत नाही अशी अनेकांची तक्रार असते. आपल्याकडे स्वतःच्या चेहऱ्याचा फोटो काढून त्याची

प्रिंट असलेले मास्कदेखील त्यामुळेच बनवले जात आहेत. त्यावर उपाय म्हणून अमेरिकेतील मिशिगन येथील रेडकलिफ व

मेडिकल डिव्हाईस कंपनीने पारदर्शी मास्क तयार केले आहेत. त्याला ‘लीफ’ असे नाव दिले आहे. हा जगातील असा पहिलाच पारदर्शक मास्क आहे ज्याला ‘एफडीए’ने मंजुरी देखील दिली आहे. हा मास्क म्हणजे एक सॅनिटायझर देखील आहे.

तीन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती हा मास्क परिधान करू शकतात. त्याची किंमत 3,673 रुपयांपासून सुरु होते. हा मास्क बॅटरीवर काम करतो. त्याच्या आतील भागात ‘अँटी फॉग’चा लेयर आहे. त्यामुळे हा मास्क नेहमी स्वच्छ दिसतो व  त्यावर बाष्प साचत नाही.

हा मास्क लीफ, यूवी आणि लीफ प्रो या तिन प्रकारात उपलब्ध आहे. त्यात यूवी-सी लाईट फिल्टर देखील आहे. त्यामुळे रोगजंतू नष्ट होतात व तो आपोआपच सॅनेटाईज होतो. अँटिमायक्रोबियल आणि वॉटरप्रूफ स्तरामुळे 99.9 टक्के रोगजंतू तो नष्ट करू शकत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

त्यामध्ये कार्बन फिल्टरही बसवलेला आहे. हा मास्क हेड स्ट्रॅप आणि ईअर स्ट्रॅप अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या मास्कमध्ये जी हवेच्या येण्या-जाण्यासाठी व्हॉल्व आहेत. मास्कला अँड्रॉईड किंवा आयओएस फोनशीके कनेक्ट करून वातावरणातील हवेची गुणवत्ता आणि व्हेंटिलेशनही नियंत्रित करता येऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here