जळगाव : 28 हजाराच्या लाचेची मागणी व स्विकार केल्याप्रकरणी यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी एसीबीच्या सापळ्यात अडकले आहेत. या प्रकरणी तक्रारदार हे यावल येथील रहिवासी असून त्यांचे वाणी गल्लीतील रस्त्याच्या कामाचे वर्क ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात मुख्याधिकारी बबन तडवी यांनी त्यांना 28 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. सदर लाच देण्याची तक्रारदाराची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी एसिबी जळगाव यांच्याकडे जाऊन रितसर तक्रार दाखल केली.
पंचासमक्ष 28 हजार रुपयांच्या लाचेची मागणी व कार्यालयात ती स्विकारल्याचे उघड झाल्यानंतर दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांच्यावर झडप घालत त्यांना ताब्यात घेतले. पोलिस उप अधिक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजोग बच्छाव, निलेश लोधी पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.