गॅस पाईप लाईनच्या स्फोटात दोघे जखमी

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथील पिंपळेगुरव परिसरात गॅस पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचा स्फोट झाला. अचानक झालेल्या या स्फोटाच्या घटनेत दोघे दुचाकीस्वार जबर जखमी झाले आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. या स्फोटामुळे निर्माण झालेल्या आगीच्या ज्वाला अतिशय उंच असल्यामुळे भिषणतेची प्रचिती येत होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली.

गेल्या मे महिन्यात देखील आगीची अशीच एक घटना घडली होती. या परिसरातील गॅस पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम सुरु असतांना गॅसची गळती सुरु झाली. सौम्य असलेल्या आगीने लवकरच रौद्र रुप धारण करण्यास वेळ घेतला नाही. या आगीने पाच कार जळून खाक झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here