नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भुषण गवई यांच्या मुलीचा हुंड्यासाठी सासरी होत असलेल्या छळप्रकरणी दाखल गुन्ह्यात सासू सासरे यांच्यासह एकुण तिघांना अटक करण्यात आली आहे. न्या. भुषण गवई यांच्या मुलीचा पती व एक फरार आहे.
न्या. भुषण गवई यांची मुलगी करिश्मा हिचा सासरी हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यात सासरे पुरुषोत्तम दरोकर (56), सासू ललिता दरोकर (52) व संजय टोंगसे (45) या तिघांना अटक करण्यात आली आहे. पती पलाश दरोकर तसेच प्रशांत टोंगसे हे दोघे जण फरार आहेत.
पती, सासू, सासरे, पतीचे मामा व मामेभाऊ असे सर्व जण हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार करिश्मा हिने सिताबर्डी पोलिस स्टेशनला दाखल केली होती. सीताबर्डी पोलिस स्टेशनला या प्रकरणी भा.द.वि. कलम 498 अ, 328, 323, 294, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथील ओंकार नगर परिसरात राहणारे पलाश दरोकर यांच्यासोबत न्या. गवई यांची कन्या करिश्माचा विवाह झाला आहे.