जनमत प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंतांचा सन्मान

On: August 1, 2021 4:34 PM

जळगाव : लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधत जनमत प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमात सुरुवातीला अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. या सत्कार समारंभास महापौर सौ. जयश्रीताई सुनील महाजन यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते हा सत्काराचा कार्यक्रम उत्साहात झाला.

आपले विचार व्यक्त करतांना महापौर जयश्रीताई महाजन यांनी म्हटले की सत्कार झाल्यानंतर मिळालेला सन्मान टिकवणे व पुढे यश प्राप्त करणे फार अवघड असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात एक ध्येय ठेवून आपल्या अभ्यासाची व भविष्याची एक रणनीती आखावी. नगरसेविका सौ. निताताई सोनवणे यांनी देखील यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रमुख उपस्थितांमधे नगरसेविका प्रतिभा देशमुख, सुचित्राताई महाजन, विवेक सोनवणे, शुक्ला सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, गुणवंत पाटील, प्रतिभा मेटकर, संजय कुमार सिंग, राजेंद्र वर्मा, विजय पाटील, हर्षाली पाटील, सुनील सोनवणे, विशाखा वाणी, वसंत कोलते आदी यावेळी उपस्थित होते. पंकज नाले यांच्या वाढदिवसानिमित्त नाना पाटील व सुरेंद्र सिंग पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण व अन्नदान कार्यक्रम झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment