घरफोडीतील फरार आरोपी अटक

जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यात फरार आरोपी आकाश उर्फ आप्या सुनिल नागपुरे यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल तिघांना अटक केली होती. अटकेतील तिघांचा साथीदार आकाश नागपुरे यास एमआयडीसी पोलिसांनी आज ताब्यात घेत अटक केली आहे.

विशाल मुरलीधर दाभाडे, विशाल किशोर मराठे आणि अभिषेक उर्फ बजरंग परशुराम जाधव अशी एलसीबीने अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप शिकारे यांच्या अख्त्यारीत सहायक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील व सुधीर साळवे यांच्या पथकाने फरार आकाश नागपुरे यास सुप्रिम कॉलनी परिसरातून अटक केली आहे.

रामेश्वर कॉलनीतील रहिवासी सिताराम देला राठोड यांच्या कुलुपबंद घराचा कडीकोंडा तोडून मे महिन्यात 65 हजार रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. काल अटक करण्यात आलेल्या तिघांकडून 23 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. आकाश नागपुरे याच्याकडून सहा हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली असून त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here