कंपनीत चोरी करणारा फरार आरोपी अटक

जळगाव : शेतीला लागणारे साहित्य तयार करणा-या नशिराबाद येथील कंपनीत चोरीची घटना घडली होती. एप्रिल महिन्यात घडलेल्या या घटनेतील तिन चोरटे यापुर्वी नशिराबाद पोलिस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतले होते. मात्र या तिघांचा म्होरक्या फरार होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली.

अरविंद अरुण वाघोदे असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तो रहात असलेल्या एमआयडीसी – सुप्रिम कॉलनी भागातून त्याला सापळा रचून आज सकाळी अटक करण्यात आली. गुन्ह घडल्यापासून अरविंद वाघोदे फरार होता. रेकॉर्डवरील अरविंदचा शोध सुरुच होता. या चोरी प्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 51/21 भा.द.वि. 380, 461 नुसार गुन्हा दाखल होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील यांच्या पथकाने य तपासकामी सहभाग घेतला.

या गुन्हयातील मुख्य सुत्रधार आरोपी अरविंद उर्फ आरो अरुण वाघोदे आज पहाटे त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या घराभोवती मध्यरात्री पासुन सापळा लावण्यात आला होता. भल्या पहाटे तो त्याच्या राहत्या घराच्या बाजुस असलेल्या गोठ्यात पथकाला गवसला. यापुर्वी अटक करण्यात आलेल्या तिघा साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने कबुल केले आहे. चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावुन मिळालेल्या रकमेतून काही पैसे त्याने मौजमजा करण्यासाठी खर्च केले. राहिलेल्या काही रकमेपैकी सात हजार पोलिस तपास पथकाने त्याच्या कब्जातून हस्तगत केले. याशिवाय चोरी केलेले शेतीला लागणारे साहित्य देखील त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. पुढील तपासकामी त्याला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here