उस्मानाबाद (भुम) : लाचेची रक्कम घेतांना एसीबीच्या सापळ्यात अडकलेल्या महिला उप जिल्हाधिकारी मनिषा राशिनकरांना अद्याप जामिन मिळालेला नाही. काल त्यांच्यासह कोतवाल विलास जानकर यांचा जामिन होऊ शकला नाही. दोघांच्या जामीनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद श्रवण केल्यानंतर न्यायालय आज (बुधवारी) निकाल देणार आहे. त्यांच्या जामिनावर काय निर्णय होतो याकडे महसुल मधील अधिकारी व कर्मचारी वर्गाचे लक्ष लागून आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी तसेच दरमहा ठरलेली रक्कम मिळण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या अटकेत असलेल्या महिला उप जिल्हाधिकारी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.
राशिनकर यांच्यासह कोतवाल विलास जानकर यांच्या जामीन अर्जावर काल मंगळवारी देखील निर्णय झाला नाही. आज याप्रकरणी न्यायालयाकडून काय निर्णय दिला जातो याकडे महसुल मधील अधिकारी व कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे. त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढणार की संपणार याची प्रतिक्षा आहे.