गोळीबार प्रकरणातील आरोपी पोलिसांना शरण

On: August 5, 2021 10:20 PM

जळगाव : जळगाव मनपाचे शिवसेनेचे उप – महापौर कुलभुषण पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक संशयीत आरोपी रामानंद नगर पोलिसांना शरण आला आहे. 25 जून रोजी कुलभुषण पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मंगलसिंग राजपूत असे शरण आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोळीबारीच्या या घटनेत उप महापौर कुलभुषण पाटील बचावले आहेत.

शरण आलेल्या मंगलसिंग राजपूत यास उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयित आरोपींपैकी किरण शरद राजपूत (24) आणि उमेश पांडुरंग राजपूत (21) या दोघांना पोलिसांनी यापुर्वीच अटक केली आहे. महेंद्र पांडुरंग राजपूत , जुगल बागुल आणि भूषण बिऱ्हाडे हे तिघे फरार होते. त्यापैकी महेंद्र राजपूत आता रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात आहे. जुगल बागुल व भुषण बि-हाडे हे फरार असून पोलिस पथक त्यांच्या मागावर आहेत. या गोळीबार प्रकरणी आरोपींविरुद्ध 120 ब हे कलम वाढवण्यात आले आहे.

संशयीत आरोपींनी केलेला गुन्हा हा पुर्वनियोजीत कट असल्याचे देखील म्हटले जात असून त्या कटानुसार आरोपींनी पेट्रोलने भरलेल्या काही बाटल्या देखील घटनेच्या वेळी बाळगल्या होत्या असे म्हटले जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment