मोहनसिंग बावरी याची पोलिस कोठडी उद्यापर्यंत

On: August 6, 2021 5:05 PM

जळगाव : बलात्काराच्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आलेल्या मोहनसिंग बावरी या आरोपीने दुस-याच दिवशी सेवानिवृत्त शिक्षकाचे घर कुलुपबंद असल्याचा फायदा घेत घरफोडीचा गुन्हा केला होता. सध्या तो एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. ए.एस.शेख यांनी त्याची पोलिस कोठडी एक दिवस वाढवली आहे.

पो.नि.प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी इम्रान सय्यद मुदस्सर काझी गोविंदा पाटील सुधीर साळवे साईनाथ मुंडे आदींनी त्याला ताब्यात घेत अटक केली होती. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले. पोलिस कोठडी दरम्यान मोहनसिंग बावरी याच्याकडून पोलिस पथकाने चोरलेली सोन्याची अंगठी हस्तगत केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment