जळगाव : जळगाव पोलिस दलातील बदली प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असून पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रक्रिया राबवली जात आहे. आज 6 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपासून पोलीस कर्मचारी बदली प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे.
पात्र असलेले 226 सहाय्यक फौजदार व पो.हेड.कॉन्स्टेबल यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उद्या सकाळी आठ वाजेपासून पोलीस नाईक व पोलीस कॉन्सस्टेबल यांना मुलाखतीकामी बोलावण्यात आले आहे.
या बदली प्रक्रीयेकामी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) सचिन गोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, उप विभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, कैलास गावडे, राकेश जाधव, भारत काकडे, विवेक लावंण, प्रभारी कार्यालय अधीक्षक निरंजन क्षिरसागर, आस्थापना लिपीक दिपक जाधव, सुनिल निकम, बाविस्कर आदींची यावेळी उपस्थिती होती.