खंडणी मागणाऱ्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

On: August 8, 2021 10:09 AM

सोलापूर : सहायक कामगार आयुक्त नीलेश येलगुंडे यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणीसह दरमहा पन्नास हजार रुपयांचा हप्ता मागणा-या गणेश बोड्डू याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

गणेश ज्ञानोबा बोड्डू (जुना विडी घरकुल, हैद्राबाद रोड, सोलापूर) याने सहायक कामगार आयुक्त नीलेश लक्ष्मण येलगुंडे (कामगार कल्याण केंद्र, दमाणीनगर) यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. तसेच तो खंडणीसाठी दमदाटी करत येलगुंडे यांच्या अंगावर धावून गेल्याची तक्रार फौजदार चावडी पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. दहा लाख रुपये खंडणी तसेच दरमहा पन्नास हजार रुपयांचा हप्ता त्याने मागितला होता. हप्ता मिळाला नाही तर काम कसे करता असे म्हणत बघून घेण्याची भाषा त्याने केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment