तिस हजार रुपयांची मागणी – अपहरणकर्त्यास पोलिस कोठडी

On: August 8, 2021 10:25 AM

सोलापूर : तीस हजार रुपयांसाठी तरुणाचे अपहरण करणा-या तरुणाला 12 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल राठोड (27), रा. हंचनाळ तांडा, विजापूरजवळ, कर्नाटक असे संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

पूजा विशाल पाटील (रा. संजयनगर, कुमठा नाका) यांनी 5 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सदर बझार पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. 4 ऑगस्ट रोजी विशाल पाटील या तरुणास सिव्हिल हॉस्पिटलमधून अपहरणकर्त्यांनी कारमधून पळवून नेले होते. तपासाअंती मोबाईलची तपासणी केली असता अनिल राठोड या तरुणाचे नाव पुढे आले होते.

विशाल पाटील हा अपहरणकर्ता अनिल राठोड यांच्या ऑर्केस्ट्रा मंडळात गायक म्हणून कामाला होता. तिस हजार रुपयांच्या उधारीच्या वादातून हा अपहरणाचा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले. या घटनेतील अजून साथीदारांचा शोध सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment