मजुरांना अडवल्याचा राग – तिघांनी पेटवले वृद्धाला

On: August 9, 2021 10:31 AM

धुळे : धुळे तालुक्यातील अंचाळेतांडा येथे शेतात जाणा-या मजुरांना अडवल्याचा राग आल्यामुळे तिघा जणांनी घरात जाऊन वृद्धाला पेटवल्याची घटना 7 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेप्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अंचाळेतांडा येथील पांडू मांगू राठोड यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार गावातील शेतमजुरांना शेतात जाण्यापासून रोखल्याचा राग मोहन महारु जाधव, दिनेश वसंत जाधव, शिवाजी संगडा जाधव या तिघांना आला. तिघांनी पांडू राठोड या वयोवृद्धाच्या घरात प्रवेश करत त्यांना दांड्याने मारहाण करण्यात आली.

याशिवाय प्लास्टिकच्या बाटलीत असलेले पेट्रोल पांडू राठोड यांच्या अंगावर टाकून त्यांना पेटवून देण्यात आले. या घटनेत राठोड भाजले गेले. पांडू राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास स.पो.नि.प्रशांत गोरावडे करत आहेत. तिघा संशयीतांच्या मागावर पोलिस आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment