सोलापूराततील आहेरवाडीत अकरा ठिकाणी घरफोडीच्या घटना

On: August 9, 2021 11:25 AM

सोलापूर : आहेरवाडी येथे शुक्रवारच्या रात्री अकरा ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमधे  अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाइल असा एकूण एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल चोरी केला आहे. याप्रकरणी वळसंग पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आहेरवाडी येथे गेल्या गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटे चारच्या दरम्यान झालेल्या घटनेत ग्रामदैवत पंचलिंगेश्वर देवाच्या दानपेटीतील रक्कम देखील चोरट्यांनी सोडली नाही. तसेच काही बंद घरे फोडून चोरीच्या घटना घडल्या आहेत.  निर्मला कोळी, गोपाळ जोशी, प्रभाकर कुंभार, मौलाली शेख यांच्या घरात चोरीचे प्रकार घडले. याशिवाय मेहबूब शेख यांचे दुकान देखील फोडण्यात आले. महादेव बाके यांच्याकडील मोबाइल व रोख रक्कम चोरीला गेली आहे. फिरोज काझी यांचा मोबाइल लंपास करण्यात आला.

गावातील विविध ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाइल व शेतीला लागणारी इलेक्ट्रॉनिक पाणबुडी मोटार आदी वस्तूंची चोरी झाली आहे. स.पो.नि. अतुल भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. साधारण चार ते पाच जणांच्या टोळीने हा प्रकार केला असल्याचा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment