मुलाची हत्या करुन विवाहितेची आत्महत्या

On: August 9, 2021 12:42 PM

नाशिक : नाशिक तालुक्यातील वनारवाडी शिवारात विवाहितेने एका इसमाच्या त्रासाला वैतागून आपल्या सात वर्षाच्या मुलाला गळफास देत स्वतः देखील गळफास घेत आपली जिवनयात्रा सपवल्याची घटना उघडकीस आली आहे. संगिता प्रकाश पवार (25) मंगरुळ ता. चांदवड असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिने आपला मुलगा कार्तिक प्रकाश पवार (7) याची हत्या केली आहे.

वनारवाडी येथे संगीता प्रकाश पवार आपला मुलगा कार्तिक याच्यासोबत भाड्याच्या खोलीत रहात होती. तिच्यासोबत पोपट संपत पवार (30) रा. मंगरुळ, ता. चांदवड हा देखील रहात होता. पोपट नेहमी मद्यपान करुन तिला मारहाण व शिवीगाळ करत होता. त्याच्या रोजच्या त्रासाला वैतागून संगीता पवार हिने 4 ऑगस्ट रोजी कार्तिक यास गळफास देत त्याची हत्या केली. त्यानंतर स्वत:नेदेखील गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली.

दिंडोरी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई केली. संगीता पवार विरुद्ध मुलगा कार्तिक पवार यास गळफास दिल्याबद्दल खुनाचा गुन्हा दाखल केला. पोपट पवार याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी पुढील तपास दिंडोरी पोलिस स्टेशनचे पो.नि. अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन नवले करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment