शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार उघडकीस

On: August 9, 2021 1:45 PM

यवतमाळ : जवळपास दोन महिन्यापासून अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ तालुक्यातील बेलोरा जिल्हा परिषदेच्या शाळेत एका सोळा वर्षाच्या विद्यार्थीनीसोबत हा घृणास्पद प्रकार सुरु होता. 7 ऑगस्ट रोजी हा निंदनीय प्रकार उघडकीस आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अरूण हरिदास राठोड (51) जवळा ता. आर्णी असे त्या नराधम शिक्षकाचे नाव आहे.

गुरु – शिष्याच्या नात्याला उघडकीस आलेल्या या कृत्याने काळिमा फासल्याचे म्हटले जात आहे. बेलोरा जिल्हा परिषदेच्या शाळेत उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली असून या शिक्षकाने आतापर्यंत अशा किती विद्यार्थिनींसोबत असा प्रकार केला असेल असा देखील एक प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment