सुनिल झंवरच्या अटकेने उंचावल्या अनेकांच्या भुवया

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेतील बडा संशयीत आरोपी सुनिल झवर यास पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून अटक करण्यात यश मिळवले आहे. सुनिल झवर याच्या अटकेमुळे अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत.

बीएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेतील अनेक संशयीत आरोपींपैकी सुनिल झवर हा बडा आरोपी म्हटल जात आहे. त्याच्या अटकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माजी मंत्री गिरीष महाजन यांचा निकटवर्तीय अशी सुनिल झवर याची ओळख आहे.

27 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे येथे बीएचआर प्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात सुनिल झवर प्रमाणेच गुन्ह्यात समावेश असलेला अवसायक जितेंद्र कंडारे याला अटक झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून सुनिल झवर फरार होता. त्याचे जामीनदेखील वेळोवेळी न्यायालयाने नाकारले. मात्र अखर सुनिल झवर हा तपास पथकाच्या हाती लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here