औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शन नंतर आता कोरोना प्रतिबंधक लसींचा देखील काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादपासून जवळच असलेल्या जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूकीस असलेला आरोग्य सेवक गणेश रामदास दुरोळे हा शासकीय कोट्यातील कोविशील्ड लसींचे डोस प्रत्येकी तिनशे रुपयांना विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. गणेश दुरोळे याला अटक करण्यात आली आहे.
रांजणगाव येथील शिवसैनिक निखिल कोळेकर यांना याबाबत माहिती मिळताचा त्यांनी पक्ष प्रमुखांसह पोलिसांना माहिती दिली. वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनला याप्रकरणी 9 ऑगस्ट रोजी आरोग्य सेवक गणेश रामदास दुरोळे याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून लसींचा साठा, लसीकरण केलेल्या कामगारांची यादी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.