नाशिकला आईने केली चिमुकल्याची हत्या

On: August 10, 2021 8:40 PM

नाशिक : नाशिक येथे आईनेच आपल्या तिन वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चिमुकल्याची हत्या केल्यानंतर विवाहीतेने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली आहे. नाशिक येथील पाथर्डी फाटा येथे घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

शिखा पाठक असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे तर रिधान पाठक असे हत्या करण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे. मुलाची हत्या केल्यानंतर महिलेने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाथर्डी फाटा येथील साई सिद्धी अपार्टमेंटमधे सदर घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच व.पो.नि. निलेश माईनकर, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख आदींनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई सुरु केली. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment