पांढरकवडा येथे तरुणाकडून देशी रिव्हॉल्व्हर, जीवंत काडतूस जप्त

On: August 11, 2021 2:08 PM

यवतमाळ : देशी रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत त्याच्या कब्जातून देशी रिव्हॉल्व्हरसह दोन जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत. पांढरकवडा शहरातील खुनी नदी परिसरात मंगळवार 10 ऑगस्ट रोजी सदर कारवाई करण्यात आली. अक्षय चित्तलवार (26) हनुमान नगर पांढरकवडा असे पोलिसांच्या ताब्यातील रिव्हाल्व्हर बाळगणा-या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी अक्षय चित्तलवार याच्याविरुद्ध पांढरकवडा पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेले रिव्हाल्व्हर त्याने अमरावती येथून खरेदी केले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, एलसीबीचे पो.नि. प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश वनारे, विनोद राठोड, नीलेश राठोड, उमेश पिसाळकर, यशवंत जाधव आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment