सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन

On: August 11, 2021 2:25 PM

सोलापूर : सोलापूर शहर पोलिस दलातील सहाय्यक आयुक्त सुहास भोसले यांचे आज 11 ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ऑफीसर जिममधे व्यायाम करत असतांना अचानक त्यांना ह्दयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांचे निधन झाले. पोलिस आयुक्त भोसले यांच्या निधनाने पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले सध्या सोलापूर शहर पोलिस दलात डिव्हिजन -1 येथे ड्युटीवर होते. जेलरोड पोलिस स्टेशन परिसरात त्यांचे कार्यालय आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 56 वर्ष एवढे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

नेहमीप्रमाणे जिमला गेल्यानंतर व्यायाम करताना त्यांना अचानक चक्कर आली होती.चक्कर आल्यामुळे त्यांनी व्यायाम काहीवेळासाठी स्थगित केला होता. पुन्हा व्यायाम सुरु केल्यानंतर त्यांना ह्दयविकाराचा धक्का बसला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment