पतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात-पती विरुद्ध गुन्हा

On: August 11, 2021 3:15 PM

नांदुरा : पतीच्या बेदम मारहाणीत साडेपाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गर्भपात झाल्याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. नांदुरा शहरातील कृष्णनगर येथील प्रियंका दीपक तायडे (24) या विवाहितेच्या तक्रारीनुसार तिचे लग्न 31 मे 2019 रोजी दीपक तायडे या तरुणासोबत झाले आहे. तिचा पती भारतीय नौदलात नेमणूकीला असून गेल्या काही दिवसांपासून दोघे पनवेल येथे रहात होते. तिच्या पतीला मद्यपानाचे व्यसन आहे. मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुन तो तिला नेहमी मारहाण करत होता.

दरम्यान फेब्रुवारी महिन्यापासून तिला दिवस गेले. अंबरनाथ येथील रुग्णालयात तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. जुन  महिन्यात तिची सासू अंबरनाथ येथे राहण्यास आली. त्याच कालावधीत तिचे आईवडील देखील तिला भेटण्यासाठी आले. सासूची सेवा केली नाही या कारणावरुन  त्याने पत्नीसोबत वाद घालत तिला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या पोटाला दुखापत झाली व रक्तस्त्राव सुरु झाला. त्यात तिचा गर्भपात झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment