जळगाव : या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 32.8 टक्के वाढ नोंदवण्यात आली. भारतातील ठिबक व तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या प्रथम क्रमांकाची तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने 10 ऑगस्ट रोजी घेतलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या म्हणजे 2021-22च्या पहिल्या तिमाहीच्या आर्थिक निकालास मंजूरी दिली व ते जाहीर करण्यात आले. विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की, जागतीक पातळीवर कंपनीकडे 3804 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स हातात आहेत.
आर्थिक वर्ष 2021-22च्या पहिल्या तिमाहीचे ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. एकत्रित करश्चात नफा 13.4 कोटी रुपये. एकत्रित कर,व्याज व घसाराकरपूर्व नफा 263.8 कोटी रूपये आणि एकल कर, व्याज व घसारा करपूर्व नफा 102.2 कोटी रुपये. एकत्रित कर, व्याज व घसारा करपूर्व नफ्याच्या मार्जिन 6 टक्कयांनी वाढून 14.8 टक्के झाले आणि एकल कर, व्याज व घसाराकरपूर्व नफ्याच्या मार्जिन1.8 टक्क्यांनी वाढून 14.7 टक्क्यांवर पोहोचला. ग्राहकांकडून कंपनीकडे जागतिक पातळीवर 3804 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स बुक.
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांचे मत
“आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीचे लेखापरीक्षणापूर्वीचे आर्थिक निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. एकल उत्पन्नात 45.3 टक्के अशी चांगली वाढ झाली व एकत्रित उत्पन्नात 32.8 टक्के वाढ झाली. आपण तुलना केल्यास हे आकडे मागील तिमाहीसारखेच आहेत (आर्थिक वर्षातील चौथी तिमाही हा काळ सूक्ष्मसिंचनाच्या व्यवसायाचा मोठा हंगाम असतो.) कंपनीच्या एकूण कामकाजात भारतात आणि जगात आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच चांगली वाढ झाली. पुरवठा साखळीत आणि निर्यातीत अनेकदा व्यत्यय आलेल्या या पहिल्या तिमाहीत कोविड-19च्या महामारी व आव्हानात्मक परिस्थितीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली होती. अशी बिकट परिस्थिती असूनही, कंपनीच्या ऑपरेटींग मार्जिनमध्ये लक्षणीय सुधारणा झाली.
एकल कामकाजात खेळत्या भांडवलाची कार्यक्षमता 31 टक्कयांनी वाढली (188 दिवस). व्यवस्थापनाच्या सततच्या लक्ष केंदित केल्याने ऑपरेटिंग रेशोत वाढ झाली आणि खर्चात कपात झाली. जागतिक पातळीवर कंपनीला मिळालेल्या 3804 कोटींच्या ऑर्डर्समुळे पुढील तिमाहीत उत्पन्नात आणखी वाढ नोंदविता येईल अशी आशा आहे”– अनिल जैन, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक