खिडकी गॅंगचा म्होरक्या जालना एलसीबीच्या जाळ्यात

On: August 11, 2021 8:18 PM

जालना : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला 35 गुन्हे दाखल असलेला गेल्या 14 वर्षापासून फरार असलेल्या ‘खिडकी गँग’च्या प्रमुखास जालना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. सिकंदर अख्तर सय्यद असे या खिडकी गॅंगच्या म्होरक्याचे नाव आहे. पोलिसांना वान्टेड असलेल्या सिकंदर अख्तर सय्यद याला जालना शहरातून ताब्यात घेण्यात आले आहे. 11 ऑगस्ट रोजी एलसीबीचे अधिकारी व कर्मचा-यांनी मिळून त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.

सिकंदर अख्तर सय्यद व त्याच्या साथीदारांनी मिळून जालना शहरातील इंदेवाडी भागातील एका घरात चोरी केली होती. या चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमालापैकी पाच तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार सिकंदर याच्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे तब्बल 35 गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment