मालेगवातून दहा धारदार तलवारी जप्त

On: August 12, 2021 9:50 AM

मालेगाव : विक्रीसाठी आणलेल्या दहा धारदार  तलवारी बाळगणाऱ्या चौघा जणांना पोलिस उपअधीक्षक लता दोंदे यांच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवाच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास मालेगाव शहरातील आमीन मौला दर्गाच्या परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या तलवारींचे मुल्य 13 हजार रुपये आहे.

मालेगाव शहरात वाढत असलेली गुन्हेगारी लक्षात घेता रात्री अपरात्री झडती घेण्याचे काम पोलिस करत आहेत. दरम्यान दहा तलवारी पोलिस पथकाच्या हाती लागल्या आहेत. या सर्व तलवारी विक्रीसाठी मालेगाव येथे आणल्या गेल्या होत्या.

अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आलेल्या या छाप्यात अबू तालिब मोहम्मद कुर्बान, मोहम्मद साजिद युनूस खान, रिहान अहमद रियाजुद्दीन अन्सारी व अब्दुल मुख्तार अब्दुल सत्तार या चौघांना धारदार तलवारींसह ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. हवालदार दिनेश पवार, राकेश उबाळे, साजिद शेख, तुषार आहिरे व सचिन बेदाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment