यवतमाळ : रेशनच्या काळाबाजार प्रकरणी बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारास धमकी देणाऱ्या तस्कराची बुधवार 11 ऑगस्ट रोजी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शेख रहिम शेख करीम असे रेशन तस्कराचे नाव आहे. या घटनेप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रेशन दुकानातील तांदुळ तस्करीची बातमी प्रसिद्ध केल्याने पत्रकार सुरेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून याप्रकरणी संबंधितावर पत्रकार संरक्षण कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
धमकी देणा-या शेख रहिम शेख करीम (रा. स्वस्तीकनगर वर्धा) याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शेख रहिम याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. सन 2018 मध्ये कळंब शेख रहिम याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार ज्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी त्याच्या गोडाऊनमधे रेशनचा 205 पोते तांदूळ आढळला होता.