शरद पवारांच्या आवाजात बदलीचे फर्मान – गुन्हा दाखल

On: August 12, 2021 5:46 PM

मुंबई : रा.कॉ. नेते शरद पवार यांचा हुबेहुब आवाज काढत फोनवरुन एकाने थेट मंत्रालयात फोन करत अमुकची बदली तमुक ठिकाणी करण्याचे आदेश दिले. बदलीबाबत शरद पवार असा फोन कधी करत नसल्याचे समजल्याने संबंधित अधिका-याने खात्रीसाठी थेट शरद पवार यांची भेट घेत विचारणा केली. आपल्याच आवाजात कुणीतरी फोन करुन खोडसाळपणा करत असल्याचे समजल्याने शरद पवार देखील अचंबित झाले.

चौकशीअंती हा फेक कॉल असल्याचे समोर आले. 11 ऑग़स्ट रोजी झालेल्या या घटने प्रकरणी गावदेवी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र तो फोन कोणत्या अधिका-याच्या बदलीबाबत होता ते समजू शकले नाही. तो फोन ज्या अधिका-याच्या बदलीबाबत असेल त्यातून माहिती पुढे येऊ शकते असे देखील म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment