यवतमाळ : विस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. गजानन गजभारे यांना पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी निलंबित केले आहे. विस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तक्रारदार, साक्षीराराचा जवाब आणि व्हाईस रेकॉर्डींग या सर्व बाबी तपासात निष्पन्न झाल्या आहेत.
यवतमाळ शहरातील वडगाव भागातील धनलक्ष्मी नगरात काही महिन्यांपूर्वी चारचाकी वाहन जाळण्यात आले होते. या घटनेप्रकरणी विजय सौंदळे यांच्यासह त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करतो असे म्हणत स.पो.नि. गजभारे यांनी त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. एक लाख रुपये मिळाले नाही म्हणून विजय सौंदळे यांच्यासह त्यांच्या मुलाविरुद्ध सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातून सुटका हवी असल्यास एक लाख रुपये द्यावे लागतील असे सौंदळे यांना निरोप देण्यात आला. विजय सौंदळे यांनी हा प्रकार न्यायालयासमक्ष तोंडी तक्रारीच्या माध्यमातून कथन केला.
त्यानंतर विजय सौंदळे यांच्या मुलाचे नाव गुन्ह्यातून कमी करायचे असल्यास विस हजार द्यावे लागतील असे सांगण्यात आले. विस हजाराची मागणी करता करता अखेर दहा हजार रुपये स.पो.नि. गजभारे यांनी घेतले. या सर्व प्रकाराची व्हाईस रेकॉर्डींग विजय सौंदळे यांनी वरिष्ठ अधिका-यांना सुपुर्द केली. तपासाअंती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. गजानान गजभारे यांना निलंबीत केले आहे.