हिरे रुग्णालयाच्या डीन यांच्याकडे चोरी

On: August 13, 2021 10:05 AM

धुळे : धुळे येथील हिरे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या घरातून सात लाख रुपयांची रोकड व तिस तोळे वजनाचे दागिने चोरी झाले आहेत. गुरुवारी भरदिवसा झालेल्या या घटनेने खळबळ माजली आहे.

हिरे रुग्णालयाच्या आवारातच अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांचे सरकारी निवासस्थान असून त्याठिकाणी चोरी झाली आहे. चोरी झाली त्यावेळी हा चोरीचा प्रकार झाला आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी उशीरा हा प्रकार लक्षात आला. डॉ. सापळे यांच्या निवासस्थानाची एक चावी मोलकरणीकडे असते. संशयाच्या आधारे मोलकरणीला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment