गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी ताब्यात ; एलसीबीची कारवाई

On: July 15, 2020 10:12 AM

जळगाव : भुसावळ शहरातील यावल नाका फॉरेस्ट चौकी परिसरातून काल रात्री अंजाळे ता.यावल येथील तरुणास गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई एलसीबी पथकाने केली असून मध्यरात्री या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि स्वप्नील नाईक, हे.कॉ.कमलाकर बागुल, पो.नाईक दादाभाऊ पाटील व प्रवीण हिवराळे भुसावळ येथे गेले होते.दरम्यान यावल रस्त्यावर एक संशयित गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह उभा असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पथकाने सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.या प्रकरणी गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणा-या अंजाळे ता.यावल येथील सागर बापूराव सपकाळे याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशनला पोलीस हवालदार रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment