मोटार सायकल चोरीतील मुख्य आरोपी एलसीबीच्या ताब्यात

On: August 13, 2021 4:41 PM

जळगाव : धरणगाव – एरंडोल रस्त्यावरील हॉटेल मयुरच्या बाहेर लावलेली मोटार सायकल चोरी प्रकरणी मुख्य फरार आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. पुढील तपासकामी त्याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पिंताबर रतन सोनवणे (रवंजे ता. एरंडोल जिल्हा जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संजय उर्फ कालु बळीराम कोळी (23) रा. वढोदा ता. यावल व गोलु कृष्णनाथ कोळी (21) रा. शिरागड ता. यावल या दोघांना यापुर्वीच अटक करण्यात आली असून दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.

तिन महिन्यापुर्वी धरणगाव येथील हॉटेल मयुरच्या बाहेर लावलेली मोटार सायकल पितांबर रतन सोनवणे, संजय कोळी व गोलू कोळी या तिघांनी मिळून चोरी केली होती. त्या मोटारसायकलच्या नंबर प्लेटवर “देव बरोबर करतो” असे लिहीले होते. पितांबर सोनवणे यास अटक करण्याकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, रमेश चौधरी, पोलिस नाईक नितीन बाविस्कर प्रितम पाटील, चालक विजय चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment